Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘खर्रा विष आहे.. खाऊ नका, देऊ नका, खाऊ देऊ नका’

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जागृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 : जिल्ह्यात भात रोवणीचा हंगाम मोठ्या जोमात आहे. या काळात कामात मन लागावे, यासाठी महिला-पुरुष मजूर वर्ग सर्रास तंबाखू व खर्राचे सेवन करतात. काही न खाणारेही व्यसनास सुरवात करतात. त्यामुळे मजूर वर्गामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने धानोरा मुक्तीपथ तालुका चमूने गोटा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तंबाखूचे दुष्परिणाम पटवून दिले. सोबतच ‘खर्रा विष आहे.. खाऊ नका, देऊ नका, खाऊ देऊ नका’ असे आवाहन केले.
मजूर शेत मालकाकडे रोवणीसाठी जात आसतात, या काळात महिला मजूरांची मोठ्या प्रमाणत खर्राची मागणी असते, त्यामुळे महिलांना मजुरी व त्यांना आवडणाऱ्या वस्तू सुद्धा दिल्या जाते. या मधे मोठ्या प्रमाणात शेत मालक खर्रा शोकिन महिलांसाठी शेताच्या बांधावर खर्रा देत असतात. यामुळे काही नवीन महिला सुद्धा या काळात तंबाखूजन्य पदार्थ खाण्यासाठी सुरावात करतात.परंतु सावधान आजच जागे व्हा महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखू विक्री बंद आहे. परंतु, अवैधपने  खर्रा विकला जातो. त्यामुळे आपण कॅन्सर सारख्या आजाराना निमंत्रण देत आहोत.
आपल्याला फुकट भेटत आहे म्हणून आपण खायला सुरवात करतो. परंतु, हे व्यसन एकदा जळल तर हे लवकर सुटत नाही. त्यामुळे  आपला पैसा ही जातो आणि आरोग्य ही खराब होतो. ज्यांना सवय लागली आहे त्यांच शरीर मेहणीती कामासाठी साथ देत नाही, कामात मन न लागणे, थकवा येणे, जेवण तिखट लागणे, जेवण कमी होणे, वजन कमी होणे, तोंड आकुंचन पावणे, तोंडाची दुर्गंधी येणे, दात किळणे, केन्सर सारखं आजर होणे इतर अनेक आजारांना आमंत्रण देतो. आपण खर्रा फक्त थुंकण्यासाठी वापरतो थोडा विचार करा, थुंकण्यासाठी आपण आपले पैसे व आरोग्य बरबाद करतो. त्यामुळे ‘खर्रा  खाऊ नका, देऊ नका, खाऊ देऊ नका’ असे आवाहन मुक्तीपथ तालुका चमूने शेतकरी व मजुरांना केले.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

https://youtu.be/0W5cwagvLOw
https://youtu.be/eYC4zWxQe7w

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.