Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षकानी अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन पानी “प्रेम पत्र” देत केली छेडछाड

  कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कुरखेडा दि, 2 एप्रिल : ज्ञानदानाचे पवित्र कार्य  करणाऱ्या शाळेतील शिक्षकानेच आपल्याच वर्गातील तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा विविध कलमान्वेय १ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास  कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला असून शिक्षन  वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे (४७) असून तो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीला ज्ञानदानाचे पवित्र कार्याचे धडे देणे   सोडून चक्क दोन पाने प्रेम पत्र देत छेडछाड केल्याचा प्रकार पीडित अल्पवयीन मुलीने घरी सांगितले . लगेच पिडीत मुलीसह पालक गावकऱ्यानी पोलिस ठाणे गाठून कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेचे गाभिर्य ओळखून ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे असून फरार  आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस पथक रवाना झाले असून शोध घेतला जात आहे .

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवोदय परीक्षेमध्ये अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चितळाचे मास घरात ,वन कर्मचाऱ्यांची गाडी दारात

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.