Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही – अजित पवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २५ मार्चकायदा व सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं कोण काम करत असेल… जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता बदल्यांचे रॅकेटबाबत भाष्य केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिस बदल्यांचे रॅकेट आहे असे बोलले जात आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत. त्यांची विश्वासार्हता काय आहे. त्याच्यात नांवे आहेत. यादी आहे त्या यादीत नांवे टाकली त्यांच्या बदल्या झाल्या का? त्यांची कागदपत्रे दाखवू का? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? यादी दिलीय त्याबाबत बोलण्यात आले आहे. मी आज नाही प्रशासनात काम करत आहे. गेली ३० वर्ष प्रशासन सांभाळत आहे असे सांगतानाच ज्यांकडे कुठलंही महत्त्वाचे पद नाही अशा पध्दतीने कुणाबद्दलही येत आहे. त्यांचीही चौकशी करु ना असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.