Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादाय़क! ८८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेला ऑटोरिक्षात बसवून दिले ऑक्सिजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सातारा, दि. १३ एप्रिल : जिल्ह्यात ८८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेला ऑटोरिक्षात बसवून ऑक्सिजन दिला गेल्याची धक्कादाय़क घटना समोर आली आहे. सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याच्याने रुग्णालयाच्या बाहेर रिक्षात बसून ऑक्सिजन देण्यात आला आहे.

सोमवारी वृद्ध महिलेचा फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संबधित महिलेला एका खासगी रुग्णालयात बेड मिळाला. साताऱ्यात एका दिवसात ९९१ म्हणजेच साधारण एक हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. १० जणांचा उपचाऱ्यादरम्यान मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.