Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; २३ जणांच्या मृत्यूसह आज १५९३ नवीन कोरोना बाधित तर ५४९ कोरोनमुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 30,103 जणांची कोरोनावर मात
  • 9969 बाधितांवर उपचार सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 17 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 549 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1593 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 40 हजार 647 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 103 झाली आहे. सध्या 9969 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 24 हजार 945 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 77 हजार 424 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वरोरा येथील 50 व 55 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, एकार्जूना, वरोरा येथील 53 वर्षीय पुरुष, गोरवट ता. चिमूर येथील 54 वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष, पथारी ता. सावली येथील 65 वर्षीय पुरुष, तळोधी, ता. चंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष, सुनयना नगर चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला, मालविय वार्ड वरोरा येथील 74 वर्षीय महिला, चंद्रपूर येथील 60 व 68 वर्षीय पुरुष, वार्ड नंबर 3, गोंडपिंपरी येथील 38 व 61 वर्षीय पुरुष, चेक बोरगाव येथील 50 वर्षीय महिला, गुरुदेव नगर धोपटाला राजुरा येथील 58 वर्षीय पुरुष, पंचायत समिती नागभिड येथील 49 वर्षीय पुरुष, वडसा येथील 43 वर्षीय पुरुष, वडाला पायकू, चिमूर येथील 50 वर्षीय महिला, शेडगाव ता. चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, गांधी नगर ब्रह्मपुरी येथील 76 वर्षीय पुरुष, मेंडकी येथील 66 वर्षीय पुरुष व कुर्झा ता. ब्रह्मपुरी येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यात आतापर्यंत 575 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 527, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1593 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 67, भद्रावती 72, ब्रम्हपुरी 181, नागभिड 112, सिंदेवाही 109, मूल 46, सावली 21, पोंभूर्णा 9, गोंडपिपरी 20, राजूरा 47, चिमूर 217, वरोरा 128, कोरपना 73, जीवती 12 व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.