Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!

यवतमाळ जिल्ह्यातल्या पुनवट या छोट्याशा गावातून पर्यावरण प्रेमी प्रणाली चिवटे या तरुणीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

सांगली, दि. २० जून : पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलवरून एक युवती महाराष्ट्र भ्रमंतीला निघाली आहे. प्रणाली चिकटे असं या पर्यावरण संवर्धन यात्रीचे नाव आहे. ९५०० किमीचा प्रवास करून ती सध्या सांगलीत पोहचली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातल्या पुनवट या छोट्याशा गावातून पर्यावरण प्रेमी प्रणाली चिवटे या तरुणीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. २८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रणाली चिकटे हिने सायकलवरून एकटीने प्रवास सुरु केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यवतमाळ मधून प्रणाली हिने हा प्रवास सुरु केला. नागपूर, अमरावती, नाशिक, रायगड, रत्नागिरी कोल्हापूर असा २१ जिल्ह्याचा सायकलवरून प्रवास करत सांगलीत पोहचली आहे. तब्बल साडे नऊ हजारांचा प्रवासाचा टप्पा प्राणिलीने पार केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रणाली चिवटे

बदलती जीवनशैली त्यामुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, याबाबत समाजात जागृती आणि बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने प्रणीलीने ही पर्यावरण संवर्धन बचाव यात्रा सुरू केली आहे.

सांगलीतुन प्रणाली ही पुणे, मुंबई, अहमदनगर मार्गे ती ३१ डिसेंबर आपल्या वाढदिवशी यवतमाळच्या आपल्या गावी पोहचणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रणाली पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचवण्याचे काम करत आहे.

हे देखील वाचा :

परकीय भाषा शिकणे झाले सहज आणि सोपे

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव पारित!

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.