Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परकीय भाषा शिकणे झाले सहज आणि सोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

आपण भारतीय अनेकदा ही उक्ती वापरतो, “हे विश्वची माझे घर”, पण आपण विचारही करत नाही, याच विश्वात अनेक भाषा ही आहेत म्हणून. आणि ही उक्ती खरंच सत्यात उतरवायची असेल तर त्या भाषा अवगत असणे हे महत्वाचे.

फक्त स्वप्नं नको याला कृतीची जोड म्हणून FLOA तुमचे स्वप्नं सत्यात आणण्यासाठी तुमच्याच मदतीला धावून आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फोरेन लँग्वेज ऑलिम्पियाड असोसिएशन (FLOA) ही विदेशी भाषांमधील तज्ञांची स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थ्यांना परकीय भाषेचे शिक्षण (अभ्यासक्रम) उपलब्ध करुन देण्यासाठी FLOA (फोरेन लँग्वेज ऑलिम्पियाड असोसिएशन) कार्यरत असून प्रत्येक विद्यार्थ्यांला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देत आहे.

पाहूया कुठे कुठे संस्था आहे कार्यरत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील काही शाळेत अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. सध्या FLOA च्या सहकार्याने काम प्रगतीपथावर आहे.

कोण कोणत्या भाषेचे शिक्षण देत आहे हि संस्था?

FLOA हि संस्था फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश या 3 भाषेचे शिक्षण देत आहे. ही संस्था
वर्षामध्ये दोन वेळा (मे आणि डिसेंबर) परीक्षा घेत असते.

५ डिसेंबर ला जर्मन, १२ डिसेंबर ला स्पॅनिश आणि १९ डिसेंबर ला फ्रेंच भाषेची परीक्षा FLOA हि संस्था घेत आहे.

https://exam.foreignlanguageolympiad.com/Account/RegisterSchool/MH4E943FAC  या लिंकवरती जाऊन FLOA या प्लॅटफॉर्मवर आपण निशुल्क नोंदणी करू शकता.

विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी शाळेला वेगळे खाते तयार करून देत असते.
सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंबधी परिपत्रक देखील प्रदान करत असते.

यात भाषेच्या विशिष्ट स्तराच्या परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी करताच एक अनन्य खाते तयार केले जाते.

FLOA केवळ परीक्षा शुल्क घेते

पातळी १ – रु. १७५/ –
पातळी २ – रु. २००/ –
पातळी ३ – रु. २२५/-
पातळी ४ – रु. २५०/ –

आणि प्रिंट करण्यायोग्य नोट्स, ऑडिओ व्हिज्युअल सामग्री विद्यार्थ्यांना अगदी विनामूल्य पुरविते. यात विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी आणि पुढच्या स्तरावर जाण्यासाठी ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे. नजीकच्या भविष्यात FLOA ऑनलाइन सत्रे आणि शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम देण्याची योजना आखत आहेत.

हे देखील वाचा :

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

 

 

 

Comments are closed.