Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या साखळी उपोषणास खास. अशोक नेते यांची भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 25 जून : महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दि. 24 जून पासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज दि. 25 जून रोजी खा. अशोक नेते यांनी सदर उपोषण मंडपास भेट दिली. व त्यांच्या अडी- अडचणी व मागण्या जाणून घेतल्या व सदर मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करून हंगामी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी खा. अशोक नेते यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी भाजपा चे अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, व हंगामी क्षेत्र कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन खा. अशोक नेते यांना दिले. या निवेदनात दि. 15 जून 2021 चे 228 हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचे किटक नाशक फवारणी आदेश पूर्ववत करण्यात यावे, बाहेरील जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यात काम देऊ नये. 2015- 2016 मध्ये नियुक्त झालेल्या जिल्ह्यातीलच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कामे देण्यात यावी. जुन्या हंगामी क्षेत्र कर्मचारी यांच्या यादीमध्ये 2015-16 मध्ये नियुक्त झालेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची यादी समाविष्ट करावी. जुन्या तसेच नवीन हंगामी क्षेत्रकर्मचारी यांना एकाच चक्राकार पद्धतीने आदेश देण्यात यावे. सर्व हंगामी क्षेत्र कर्मचारी यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी एफ आर पी च्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार – सुनील केदार

हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.