Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरी आलेल्या नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत प्रियकरासोबत पोबारा केला. नववधू घरात दिसत नसल्याने सासरच्यांनी शोधाशोध केली. ती सापडत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

नववधू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर तीनच दिवसात पोलिसांनी नववधूला शोधून काढले. तिच्या चौकशीत या घटनेचा उलगडा झाला. नववधूने लग्नानंतर दोनच दिवसात सासरी चोरी केली होती. तसेच पोलिसांनी अटक केल्यावर कोरोना तपासणीसाठी नेत असताना पळून जाण्याचाही प्रयत्न केला. कोरोना तपासणीसाठी नेत असताना महिला हवालदारावा धक्का देत ती काही अंतरापर्यंत पळून गेली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महिला हवालदार धक्क्याने खाली पडल्यावर तिने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूनचे लोक जमा झाले. त्यांना घडलेली घटना समजल्यावर काही जणांनी बाईकवर जात पळणाऱ्या महिलेला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या महिलेचा प्रियकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महिलेने चोरलेले दागिने आणि रोकड त्याच्याकडेच असल्याने महिलेने सांगितले. महिलेची आणखी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नववधू फिरोजपूरमधील हुमांयुनगरची आहे. टापा कलामधील सोनूसोबत तिचे २० जूनला लग्न झाले होते. त्यानंतर २१ जूनला तिने सासरचे दागिने आणि रोकड लांबवत प्रियकर मनोजसोबत पोबार केला होता. या महिलेकडे चोरलोली रोकड किंवा दागिने आढळले नसल्याने तिच्यावर सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी एफ आर पी च्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार – सुनील केदार

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

 

Comments are closed.