Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टोकीयो ऑलिंम्पिक-२०२० : राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क दि. १ जुलै : टोकीयो ऑलिंम्पिक – २०२० साठीराज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये विक्रमांची उंच शिखरे गाठावीत,राज्य आणि देशासह माता-पित्यांचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण  मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

टोकीयो ऑलिंम्पिक -२०२० चे आयोजन २३ जुलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान करण्यात येणार आहेत.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ८खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना शासन आर्थिक मदतीसह सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. राज्यशासन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत करीत असल्याचे ना. सुनील केदार यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवड झालेल्या खेळाडूंची वैयक्तिक माहिती

१)राही जीवन सरनोबत-कोल्हापूर, खेळ-शुटींग-२५ मीटर पिस्तूल, महाराष्ट्र शासनात थेट नियुक्तीद्वारे उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक, महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू.

२)तेजस्वीनी सावंत-कोल्हापूर, खेळ शुटींग-५० मीटर ,थ्री रायफल पोजिशन, शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्तीद्वारे विशेष कार्यकारी अधिकारी (उपसंचालक दर्जा) पदी नेमणूक, महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू

३)अविनाश मुकुंद साबळे- बीड. खेळ- अॅथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचेस, सेनादल मध्ये नायब सुभेदार पदी कार्यरत, महाराष्ट्र शासनाच्या निवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू

४)प्रविण रमेश जाधव-सातारा, खेळ- आर्चरी- रिकर्व्ह, सेनादल मध्ये नायब सुभेदारपदी कार्यरत, महाराष्ट्र शासनाच्या निवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू

५) चिराग चंद्रशेखर शेट्टी-मुंबई, खेळ बॅडमिंटन पुरुष दुहेरी “अ” श्रेणी अधिकारी, इंडियन ऑईल

६) विष्णू सरवानन,मुंबई, खेळ -सेलिंग- लेजर स्टँडर्ड क्लास, सेनादलात नायब सुभेदारपदी कार्यरत

पॅराऑलिंम्पिक पात्र खेळाडू

७) स्वरुप महावीर उन्हाळकर,कोल्हापूर, खेळ-पॅरा शुटिंग-१० मीटर रायफल

८) सुयश नारायण जाधव,सोलापूरखेळ-पॅरा स्विमर-५० मीटर बटर फ्लाय,२००मीटर वैयक्तिक मिडले,महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती व्दारे “अ” श्रेणी क्रीडा मार्गदर्शक नियुक्ती

हे देखील वाचा :

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्याचे दिले निर्देश

डॉ. रवी धकाते : आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचा आश्वासक चेहरा

प्रत्येकाने आपल्या निवासी तसेच कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.