Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. रवी धकाते : आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचा आश्वासक चेहरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर

काही व्यक्तींच्या अंगी निष्ठा, प्रामाणिकपणा अन् सर्वसामान्य घटकांसाठी काम करण्याची असलेली अंगभुत वृत्ती व तळमळ त्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच असते. ही व्यक्तिमत्त्वे जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत असतात. किंबहुना समाजाचे ते नायकच ठरत असतात.

आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रश्नांना योग्य प्रकारे न्याय देऊन सर्वसामान्यांना न्याय देऊन दिलासा देत त्यांच्या गालावर आनंदाचे हसू उमटवणारे ही व्यक्तिमत्त्व आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळे आश्वासक ठरतात. निष्ठा, प्रामाणिकपणा, वंचित घटकांसाठी काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हीच त्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारी ठरते.

वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक संचालक, ते डॉ. आनंदीबाई जोशी सर्वोत्कृष्ट डॉक्टर पुरस्कार प्राप्त आरोग्यविभागाचे आरोग्यदूत  व आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांचा आश्वासक चेहरा म्हणून ओळख असलेले व तळागाळातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडणारे डॉ. रवी धकाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज डॉक्टर्स डे च्या निमित्याने या कोरोना योद्धाला लोकस्पर्श न्यूजचा सलाम.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणजे प्रशासन या प्रशासनाचे कर्तव्यनिष्ठ प्रशासक जनतेच्या सुखदुःखाशी मिळालेपणाचा अनुभव घेणारे डॉ. रवी धकाते यांनी आपल्या कामांर्तगत विदर्भात आज नावलौकीक मिळविला आहे. डॉ. धकाते  हे जनतेच्या सेवेत अनेक वषार्पासून रुजू आहेत. त्यांच्या या सेवेत त्यांनी अनेक गरजू व गरिब जनतेच्या भावना व आवश्यकता समजून घेऊन शासनाची अनेक अनुदाने व निधी तत्परतेने रुग्णांपर्यंत पोहचविला.

त्यामुळेच लोकांना त्यांचा मोठा आधार वाटू लागला. डॉ. धकाते यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आलेली अनेक संकटे त्यांनी शांत व उत्कृष्ट नियोजनाने, त्यांना संकटे न म्हणता आव्हाने आहेत असे म्हणत संकटांचा सामना करीत परिस्थिती हाताळून त्यातून मार्ग काढला .

यावेळी त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना महामारीमध्ये आपल्या कार्यकुशलतेने यशस्वी सामना करत आहेत. सध्या ते विदर्भाचे कोरोना टास्क फोर्सचे नोडल ऑफिसर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. या युद्धात स्वतःची व आपल्या परिवाराची पर्वा न करता त्याच्यासह संपूर्ण परिवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यातून बरे होऊन खरे कोरोना योद्धा म्हणून कोरोनाशी युद्ध लढत आहेत. त्यांच्या अत्यंत मृदू, संयमी, मनमिळाऊ,कार्यकुशलतेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळवून दिल्यामुळे अनेकांना जीवनदान देण्यात ते यशस्वी झाले.

प्रशासनाने जनतेच्या सेवेत तयार केलेले अनेक उपक्रम, योजना, अभियान व विविध आरोग्य शिबीरे या कामांनी त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर राज्य केले. प्रशासकीय काम करत असताना लोक नेत्यांची भूमिका, घरातील ज्येष्ठ वडीलधाऱ्यांची भूमिका, सामाजिक भान ठेवून आरोग्यदूत डॉ. धकाते यांनी वैद्यकीय अधिकारी ते सहायक संचालक म्हणून काम करत असताना लोकहितार्थ दृष्टीने प्रशासन राबवून शासनाची प्रत्येक योजना जनसामान्यापर्यंत कशी पोहचेल यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांच्या कार्यालयात गेलेली व्यक्ती आपली समस्या त्यांच्या समोर न डगमगता मांडू शकत होती. त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करुन दिलासा देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला.

डॉ. धकाते यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय सेवा देत असताना विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. गोंदिया येथे जिल्हा शल्यचिकित्सक असतांना भर उन्हाळ्यात अश्यक्य वाटणारी लाईफ लाईन ट्रेन आरोग्य शिबीर आपल्या कार्यकुशलतेने यशस्वीरित्या राबविण्यात त्यांना यश आले. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांनी घेतली. बीबीसीने तर  त्यावर लघुचित्रपट तयार केला. या शिबिराला राज्य, देशातल्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

त्याकरिता त्यांना विशेष सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे तत्कालीन आरोग्य सचिव डॉ सुजाता सौनिक यांनी उष्म कृती आराखडा यावर उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल डॉ. रवी धकाते यांचे अभिनंदन केले होते. कायापालट अभियान, बाल आरोग्य अभियान, स्त्री आरोग्य अभियान, एड्स, कृष्ठरोग, हिवताप जनजागृती अभियान असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. त्यांना आरोग्य क्षेत्रातील डॉ. आनंदीबाई जोशी सर्वोत्कृष्ट डॉक्टर अवॉर्डसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी गोंदिया येथे असतांना अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीची स्थापना करून समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले.

डॉ. धकाते हे समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हे सर्व सेवा देत असतांना त्यांना त्यांच्या आईचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य राहिले. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळेच डॉ. धकाते यांनी यशाची शिखरे गाठलेली आहेत. त्याबरोबरच त्यांच्या पत्नीसुध्दा उत्कृष्ट नेत्र चिकित्सक आहेत. त्यांना पण प्रशासनाने अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुन्हा एकदा या कोरोना योद्धाला डॉक्टर डे निमित्ताने सर्व जनतेकडून व लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कडून सलाम.

हे देखील वाचा :

राज्यपालांनी पाठवले ठाकरे सरकारला पत्र, मुख्यमंत्र्यांना करून दिले स्मरण

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडा मंत्री सुनील केदार

 

 

Comments are closed.