Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्याचे दिले निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. 1 जुलै : राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांसंदर्भातील निकषांबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, उपसचिव एस. एम. खाडे तसेच निकष बदलण्याच्या अनुषंगाने मागणी केलेले रामचंद्र पिल्दे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वातंत्र्यसैनिकांना नियमित सन्मान निवृत्तिवेतन मिळेल याची दक्षता घेण्यात यावी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिकांची यादी नियमितपणे अद्ययावत करण्याबाबत विभागाने सूचना द्याव्यात, असे निर्देशही ना. दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. रवी धकाते : आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचा आश्वासक चेहरा

प्रत्येकाने आपल्या निवासी तसेच कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

दिड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

 

 

Comments are closed.