Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! पतिनेच आपल्या पत्नी सह मुला मुलीची केली हत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज गावात उडाली खडबळ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, दि. २१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चुरडी गावातील ५१ वर्षीय रेवचंद बिसेन या व्यक्तीनेचे आपल्या पत्नी सह मुला मुलीची हत्या करित स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केल्याने खडबळ उडाली असुन मृतका मध्ये ५१ वर्षीय रेवचंद बिसेन ४५ वर्षीय पत्नी मालता बिसेन २० वर्षीय मुलगी पोर्णीमा आणि १७ वर्षीय मुलगा तेजस बिसेन यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतक रेवचंद बिसेन हे ट्रासपोर्ट व्यवसायिक असुन त्यांच्या ड्रायव्हरने आज सकाळी त्याना फोन केला असता रेवचंद यानी फोन उचलला नसल्याने ड्रायव्हर ने सकाळी घरी येत त्याना दारातुन आवाज दिले असता दार न ऊघडल्याने ड्रायव्हर ने खीडकीतुन डोकावुन पाहिले असता घरात मृतदेह पडले दिसल्याने ड्रायव्हरने याची माहिती आजूबाजूच्या लोकांना देत दार तोडले असता घरातिल ९० वर्षीय आजी खेमन बाई हिला वगडता सर्वांची हत्या झाले असुन मृतदेह बेडवर पडलेले असल्याने याची माहिती गावकर्यानी तिरोडा पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटंना स्थळाचा पंचनामा करित हत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त करित रेवचंद यानेच स्वतः आपल्या पत्नी आणि मुला मुलींची हत्या करित स्वतः घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी माध्यमाना या संदर्भात माहिती देने टाळले आहे. मात्र रेवचंद यानी आपल्या कुटुंबातील आईला वगळता इतराचीं का हत्या केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.