Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावात शिरून बिबट्याने केली गायीची शिकार; गावकऱ्यामध्ये दहशत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलडाणा. दि. २७ डिसेंबर :  शेगांव तालुक्यातील वरखेड बुद्रुक गावानजीक लोकवस्ती असलेल्या शंकर रमेश हिंगणे यांच्या गोठ्याबाहेर बांधलेली गायीची बिबट्याने शिकार केल्याची घटना आज सकाळच्या उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावकर्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत शेतकरी शंकर हिंगणे यांनी शेगांव वन विभागाशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे  वरखेड बुद्रुक शिवारामध्ये वन विभागाने पाहणी करून गावकऱ्यांना दहशत मुक्त करावे अशी मागणी वरखेड बुद्रुक गावकऱ्यांकडून होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे काळाच्या पडद्याआड…

विहिरीत पडलेल्या जंगली वराहचे वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.