Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे रविवार पर्यंत काम बंद आंदोलन….

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. १० फेब्रुवारी : अमरावती येथील उड़ान पुलावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या नंतर त्याचा निषेध म्हणून अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या महीला कार्यकर्त्यांनी काळीशाई फेकली होती. त्यामुळे मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी काल पासून पालिकेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांनी केली आहे. रविवार पर्यंत हे काम बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शाईफेकीचा तीव्र निषेध कर्मचाऱ्यांचे वतीने करण्यात येत असून आज मनपा समोर सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी पोलिसानी आमदार रवि राणा यांच्या सह अकरा जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीसांनीं ही कारवाई राजकिय दबावाखाली केली असल्याचे आमदर रवि राणा यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अमरावती येथील मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.