Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत कु. भार्गवी कांबळे हिने पटकाविला प्रथम क्रमांक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. ५ मार्च :  विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी, सावळी ची खेळाडू आणि नव कृष्णा व्हॅली स्कूल, MIDC कुपवाड ची विद्यार्थिनी कु. भार्गवी सतीश कांबळे हिने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

तसेच १८ वी टी. एफ.आय. राष्ट्रीय तसेच १२ वी डब्लू. एस. टी. एफ. आंतरराष्ट्रीयटांगसुडो चॅम्पियनशिप नवी दिल्ली येथील छात्रसेना स्टेडियम वर पार पडलेल्या स्पर्धेत दोन्ही स्तरा वर दमदार कामगिरी बजावली.यावेळी कु. भार्गवीने दोन सुवर्णपदक प्राप्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तिला यासाठी ऑल सांगली जिल्हा थांग ता असोसिएशन मार्शल आर्ट प्रशिक्षक मनोज कांडकर, तसेच अमर बनसोडे अध्यक्ष टांगसुडो महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या यायशाबद्धल नव कृष्णा व्हॅली स्कूल MIDC कुपवाड मधील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित

कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.