Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है” काँग्रेसच्या आमदाराची नवी घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर दि,०६ एप्रिल :  “ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है”अशी नवी घोषणा दिली, या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, दरम्यान देशात डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं सुरू  आहेत .

अश्यातच आज सोलापुरात  काँग्रेस च्या वतीने आमदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी दुचाकी रस्त्यावर टाकून गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यामध्ये ईडीच्या वतीने ज्या कारवाया होत आहेत त्याकडे लक्ष वेधत  आमदार प्रणिती शिंदे यांनी “ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है” अशी नवी घोषणा दिली, या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, दरम्यान माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.