Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ ?

ईडीने तयार केली प्रश्नांची जंत्री...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २८ ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून, यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर प्रकरणाची लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून, त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित पवार यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या या कंपनीमध्ये सुमारे १० कोटी रुपयांचा बेहिशोबी व्यवहार झाल्याची लेखी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन २००६ ते २००९ या कालावधीमध्ये संचालक होते. तसेच, या कंपनीशी येस बँक-डिएचएफएल घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान व सारंग वाधवान यांचा देखील अत्यंत जवळून संबंध असल्याचे समजते. मात्र, वाधवान बंधूंचे नाव येस बँक-डिएचएफएल घोटाळ्यात पुढे आल्यानंतर रोहित पवार यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण

परली औष्णिक केंद्राजवळ स्फोट घडवण्याचा प्रयत्न ?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.