Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परली औष्णिक केंद्राजवळ स्फोट घडवण्याचा प्रयत्न ?

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

परळी 28 ऑगस्ट :-  अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र व औष्णीक वीज निर्मिती केंद्रात येणार्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यातील एकमेव असलेले परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र कायम अतिसंवेदनशील राहिले आहे.

या औष्णीक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी व इतर व्यक्तीपासुन धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते.परंतु गत दोन वर्षापासून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे केंद्रातून बाहेर पडणार्या राखेची वाहतुक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसवले गेले.यामुळे औष्णीक वीज निर्मिती केंद्रासच धोका निर्माण झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राख उपसा करणार्या राख माफियाकडुन औष्णीक वीज निर्मिती केंद्राजवळच स्फोट करुन राख उपसली जात होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास असाच स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांच्याकडुन जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे,बॅटरी,वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.