Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वज्रेश्वरी येथे नागरिकांना कायद्याचे धडे; विधी सेवा प्राधीकरण आणि भिवंडी वकील संघटनेचा उपक्रम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वज्रेश्वरी, दि. २७ ऑगस्ट :  सामान्य नागरिकांना कायद्याचे ज्ञान मिळावे, प्रत्यकाला आपले हक्क आणि अधिकाराची माहिती मिळावी यासाठी भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथे जिल्हा विधी सेवा प्राधीकरण आणि भिवंडी वकील संघटनेच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भिवंडी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, तथा सह दिवाणी न्यायाधीश श्री. एस एस काळे यांच्या हस्ते शिबिराचे उत्घातक करण्यात आले. यावेळी न्या. श्री. एस एस काळे आणि भिवंडी तालुका वकील संघटनेचे अद्यक्ष ऍड. मंजित राऊत यांनी उपस्थितांना कायदेविषयक आणि न्याय प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. “न्याय हा सर्वाना मिळाला पाहिये आणि न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाने विधी सेवा समिती कायदा १९८६ साली संमत केला आहे. त्यासाठी सर्व नागरिकांना कायद्याचे मुलभूत ज्ञान मिळावे या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे “ऍड. मंजित राऊत यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी भिवंडी तालुका वकील संघटनेचे सचिव ऍड जितेंद्र पाटील, वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैध्याकीय अधिकारी डॉक्टर महादेव कावळे,तसेच गणेशपुरी पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. श्री. महेंद्र गावडे ,प्रमोद राऊत, अंबाडी येथील श्रमजीवी संघटनेचे श्री. जयेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, आशा सेविका यांनी उपस्थितराहून शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…

धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!

 

धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या! 

 

Comments are closed.