Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा केला निर्घृण खून..!

कल्याण मधील भयंकर घटना ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कल्याण, 07, सप्टेंबर :-  नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आपल्या आईचा खून एक नराधम मुलाने केल्याची घटना कल्याण पूर्वेकडे असलेल्या हनुमाननगर भागात घडली.

आपल्या आईचा खून करणाऱ्या नराधम मुलाचे नाव आहे रवी पुमणी (३४ वय ) राहणार प्रभुकुंज सोसायटी, हनुमान नगर, कल्याण पूर्व, तर सरोज पुमणी असे त्याच्या आईचे नाव आहे. आपल्या पापाचे कृत्य लोकांसमोर येऊ नये म्हणून त्याने आईचा गळा दाबून खून करून आईचा मृतदेह नायलॉन दोरीला लटकवून तो सिलिंग फॅनला।लटकावला. त्यानंतर आईने आत्महत्या केली असा बनाव करत त्याने शेजारच्या लोकांना सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले. त्यात ही आत्महत्या नसून गळा दाबून खून केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता सरोज यांचा मुलगा रवी यानेच त्यांची गळा दाबून हत्या केल्याचे निदर्शनास आले. चौकशीत त्याने नशा करण्यासाठी आईकडे पैसे मागितले, तिने ते दिले नाहीत म्हणून तिचा गळा।दाबून खून केल्याचे कबूल केले. याप्रकरणी भादवि खून केल्याचा ३०२, आणि पुरावा नष्ट करण्यासाठीचा २०१ कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठाण्यात शिवसेनेची गळती सुरूच .

खळबळजनक : नागपूर जेल मधून गांजा तस्करी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.