Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत 22 ठिकाणी शासकीय योजनांच्या जत्रेतून 1.84 लक्ष नागरिकांना लाभ

अजूनही जिल्हयात 40 ठिकाणी भरणार योजनांची जत्रा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 26 एप्रिल :‘शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी’ हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा हे अभियान गडचिरोलीत विविध तालुक्यांमध्ये राबविले जात आहे. सरकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून शिबीरांचे आयोजन करून थेट गावागावात योजना पोहचविल्या जात आहेत. आत्तापर्यंत गडचिरोली जिल्हयात 22 ठिकाणी योजनांची जत्रा भरविण्यात आली होती. यामध्ये एकुण 184241 लाभार्थ्यांना वेगवेगळया योजनेत लाभ वितरीत करण्यात आला. नागपूर विभागातून गडचिरोली जिल्हयाने दमदार कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हयाची प्रशंसा केली. नागपूर विभागात शासकीय योजनांची जत्रा या उपक्रतातून सुक्ष्म नियोजनाद्वारे गरजूंना आवश्यक मदत देण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा कार्य करीत आहेत. गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आकांक्षित जिल्हा योजनेअंतर्गत ‘नागरिकांचे लाभ वितरण प्रणाली’ तयार करण्यात आली होती. सदर प्रणालीचा वापर करुन ज्या पात्र नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळला नव्हता त्या नागरिकांची यादी तयार करुन शासकीय योजनांची जत्रा गडचिरोलीतील तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

अभियानाची तयारी म्हणून दिनांक 01 एप्रिलपासून नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले होते. नागरिकांनी सीएससी केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवांमध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास, नॉनक्रिमीलीअर, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, नवीन व दुय्यम रेशन कार्ड, जॉबकार्ड, पीएम किसान योजनेचे नवीन व दुरुस्ती करुन लाभ देण्यात आला, राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी यांना लाभ देण्यात आला, मतदार नोंदणी व दुरुस्ती करीता ऑनलाईन अर्ज मोफत दाखल करुन नागरिकांना मोफत लाभ वितरण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर, जंतनाशक औषधी वाटप करण्यात आले. कामगार विभागाने नागरिकांना कामगार कार्ड वाटप केले, आरोग्य विभागाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आयुष्यमान कार्ड (Gold card) बनवून नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत बॅंकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये पीएम सुरक्षा योजनेचे व पीएम जीवन ज्योती वीमा योजनेचे अर्ज नागरिकांकडून भरुन घेण्यात आले. व सदरच्या नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच ग्रामपंचायत मार्फत दाखल्यांचे वितरण करण्यात आले. सामाजीक वनिकरण विभागाणे नागरिकांना झाडे वाटप केली.

मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मत्स्य व्यवसाय साधनावर अर्थसहाय योजने अंतर्गत नागरिकांना लाभ प्रदान करण्यात आला. तसेच नागरिकांना वीज जोडणी महाराष्ट्र विद्युत वितरण विभागामार्फत देण्यात आली. कौशल्य विभाग अंतर्गत तरुणांची कौशल्य विकास प्रशिक्षण करीता नोंद करण्यात आली. गडचिरोली उप अधिक्षक भुमीअभिलेख विभागामार्फत नागरिकांना रि नंबरींग देण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासकीय योजनांच्या जत्रेत लाभाबरोबर विविध योजनांची माहिती व योजनांचे महत्त्व अभियांनस्थळी देण्यात येत आहे. शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमांत स्थानिक खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. जिल्हयातील प्रत्येक विभाग आणि विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग असून गरजूंना लाभ वितरीत करण्यासाठी त्यांचे योगदान आहे. येत्या काळात उर्वरीत 40 ठिकाणी असेच यशस्वी उपक्रम राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.