Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी वांगेपल्ली पोचमार्गाचे रस्ता बांधकाम आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

तेलंगाणा राज्याचा प्रवास होणार सुखकर.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 30 मे – अहेरी ते वांगेपल्ली पोचमार्गाचे बांधकाम न झाल्याने मागील अनेक दिवसांपासून तेलंगाणा राज्यात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अहेरी तालुका मुख्यालय जवळ असलेल्या वांगेपल्ली येथील पोचमार्गाचे लवकरच बांधकाम होणार असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते 30 मे रोजी भूमिपूजन करण्यात आले आहे.त्यामुळे अहेरी वरून तेलंगाणा राज्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे.

प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यापासून या रस्त्यावर 24 तास वर्दळ बघायला मिळत आहे.मात्र, पुलापासून ते अहेरी-सुभाषग्राम रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.मात्र, आता ही अडचण दूर होणार असून राज्यसीमा पासून अहेरी-सुभाषग्राम रस्त्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली पोचमार्गाचे मोरीसह बांधकाम होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भूमिपूजन कार्यक्रमात माजी जि प सदस्य तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम,सामाजिक कार्यकर्ते अजय नागुलवार,रस्ता कामाचे कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.