Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रुग्ण नातेवाईकांचा हलगर्जीपना,दोन मातांचा मृत्यू,

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात चिकित्सक ची गरज..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि १०:  अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील चार दिवसात रुग्णालयाशी संबंधीत असलेल्या दोन नवजाताना घरी व दवाखान्यात जन्म दिल्यानंतर रुग्णालयात आणल्यावर औषधपचार करून रुग्ण आपल्या घरी गेल्यानंतर पुन्हा रुग्णांची प्रकूर्ती खालावल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर संबंधित रोगाचे चिकित्सक उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यासाठी सांगीतले. त्यानंतर रुग्ण परिवारातील  रेफर करताच आपल्या घरी घेऊन गेले व  गडचिरोली येथे रेफर केलेल्या अशा दोन मातांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. सरिता तोटावार, (२४),राहणार चिंचगुंडी व नागुबाई कोडापे (२३) राहणार वडलापेठ अशी मृत मातांची नावे आहेत.

मृत्त सरिता ही हृदय रोगाशी निगडित आजारी असल्याची माहिती आहे. ३ मे ला उपचारानंतर दवाखान्यात चिकित्सक नसल्याने रेफर करण्याची सूचना असतानाही रुग्ण नातेवाईकांनी घरी घेवून गेल्यानंतर तिची प्रसूती झाली. मात्र नंतर प्रकृती खालावल्याने पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यावेळी तिचा मृत्यू हृदयविकाराने घरीच झाल्याची माहिती  डॉक्टरांनी दिली असून त्यानंतर रुग्णालयातच शवविच्छेदन व पोलीस पंचनामा करून मृत शव परिवाराला सोपविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर मृत्तक नागूबाई ,२३ एप्रिलला प्रसूतीनंतर दोन दिवसांनी सुट्टी झाली. नंतर १३ दिवसांनी प्रकृती जास्त खालवल्याने पुन्हा भरती झाली. मात्र रुग्णालयात चिकित्सक नसल्याने गडचिरोली येथे रेफर केल्यानंतर तिचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयात चिकित्सकाची गरज असल्याची बाब  लोकप्रतिनिधींनी लक्षात घेवून तत्काळ नियुक्ती करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ गडचिरोली येथे प्रतिनियुक्तीवर आहे. नेत्रतज्ञ सुद्धा नाही. जिल्ह्यात एकमेव कान, नाक ,घसा तज्ञ गडचिरोली येथे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांतील नागरिकांना कान,नाक, घशाचे आजार होत नाही का ?असा प्रतीप्रश्न नागरिक विचारत आहेत.
तसेच उपजिल्हा रुग्णालयात तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची ३० पैकी १० पदे रिक्त आहेत.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सुद्धा ४ पदे रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांवर, आजारांवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.

सदर घटनेत दोन मांतांचा मृत्यू उपजिल्हा रुग्णालयात झालेला नाही. त्यातील एका रुग्णाच्या नातेवाईकांनी रेफर सांगीतल्यानंतरही स्वमर्जीने रुग्णांला घरी घेऊन गेल्यानंतर मृत्यू झाला तर दुसरा गडचिरोली येथे मृत्यू झाला आहे .

डॉ. कन्ना मडावी

उपजिल्हा रुग्णालय अहेरी,

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.