Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडपिपरीत विदर्भवाद्यांचा ठिय्या आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी, दि. ८ डिसेंबर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज विविध मागण्यांना घेत गोंडपिपरीत ठिया आंदोलन करण्यात आले.

विदर्भवादी नेते अँँड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी झाले. गोंडपिपरीच्या गांधी चैकात हे आंदोलन चार तास चालले.
वेगळा विदर्भ करण्यात यावा, लाॅकडाउनच्या काळातील विजबील माफ करावे या मागण्या आंदोलनातून मांडण्यात आल्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष अरूण वासलवार,प्रफुल आस्वले,श्रिराम काळे,नितेश झाडे,किसनराव गरपल्लीवार,सुधीर फुलझेले,राजकुमार पिंपळशेंडे,रमेश धुडसे,श्रिकांत मुंजेकर,रविद्र हेपट,भारत खामनकर,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.