Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसला, दोन सख्ख्या बहिनींचा जागीच मृत्यू

जालना, दि. १० डिसेंबर: जालना तालुक्यातील नाव्हा येथील आपल्या आजीच्या गावी आलेल्या दोन सख्या लहान बहिणींचा भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील सिंदखेडराजा रोडवरील नाव्हा गावच्या शिवारात ही घटना घडलीय. 6 आणि 10 वर्षीय अशी मृत्युमुखी पडलेल्या या मुली आहेत. ९ डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सिंदखेडराजाहुन जालनाकडे कंटेनर हा भरधाव वेगाने जात असताना कंटेनर चालकाचा अचानक ताबा सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणात खेळत असणाऱ्या मुलींच्या अंगावरून गेला.या अपघातात दोन्हीही मुली कंटेनरखाली चिरडल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत शेतकऱ्याच्या घराचंही नुकसान झालं आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या दोन बहिणी धारकल्यानं येथील शेख सलीम यांच्या त्या मुली होत्या, सुट्टी असल्याने या दोन्ही बहिणी नाव्हा येथे आपल्या आजोळी आलेल्या होत्या. या घटनेने गावात ही सर्वत्र शोककळा पसरली आहे.या ट्रक चालका विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मृत झालेल्या दोन्ही बहिणींना शवविच्छेदन साठी जालना येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते.

Comments are closed.