Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज 55 नवीन कोरोना बाधित तर 35 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.17 डिसेंबर: आज जिल्हयात 55 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8705 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8228 वर पोहचली. तसेच सद्या 382 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 95 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. एक नवीन मृत्यूमध्ये तालुका गडचिरोली रा. शिवनी येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश असून सदर व्यक्ती पिलीयाने पिडीत होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.39 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला आहे.

नवीन 55 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 8, आरमोरी 7, भामरागड 0, चामोर्शी 4, धानोरा 6, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 35 रूग्णांमध्ये गडचिरोली 12, अहेरी 5, आरमोरी 2, भामरागड 5, चामोर्शी 1, धानोरा 5, एटापल्ली 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0 व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील वनश्री कॉलनी 1, कॅम्प एरिया 1, साईनगर 1, रेड्डी गोडाऊन 1, आयटीआय चौक 1, सुभाष वार्ड 1, कन्नमवारवार्ड 1, जडेगाव 2, अयोध्यानगर 1, पोटेगाव रोड 1, स्थानिक 1, विवेकनंदनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये हॉकी ग्राउंडजवळ 2, आलापल्ली 1, स्थानिक 3, रेपनपल्ली 1, सीआरपीएफ 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 6, सीसीसी 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, कुथेगाव 1, स्थानिक 1, माडेमुधोली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 4, पवनी 1, येरंडी 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये वटेली 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, तेलगांव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये भगतवार्ड 1, कोरेगाव 7, हनुमान वार्ड 1, कोकाडी 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे.

Comments are closed.