Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 26 नवीन कोरोना बाधित तर 48 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 19 डिसेंबर : आज जिल्हयात 26 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 48 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8762 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8325 वर पोहचली. तसेच सद्या 341 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 96 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.01 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.89 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्के झाला.

नवीन 26 बाधितांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 2, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 48 रूग्णांमध्ये गडचिरोली 15, अहेरी 4, आरमोरी 3, भामरागड 3, चामोर्शी 4, धानोरा 6, एटापल्ली 2, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 4 व वडसा मधील 5 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील फुले वार्ड 1, विवेकनंदनगर 1, पोलीस मदत केंद्र पोटेगाव 1, पीएसएसी पोर्ला जवळ 1, साईनगर 1, गोकुलनगर बायपास रोड जवळ 1, विसापुर 1, मेडिकल कॉलनी 1, इंदिरानगर 2, सोनापुर कॉम्पलेक्स 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, आरमोरी तालुक्यातील कुरांडीचक 1, स्थानिक 1, बर्डी 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये हितपायी 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, जयनगर 1, आष्टी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये खेडी 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कसनसुर 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0 तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.