Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि.१९ डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे.  मागास प्रवर्गातील जागांवर निवडणूक लढविण्यासस इच्छुक असलेल्या व त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 1 ऑगस्ट पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी कळविले आहे.   जात वैधता प्रमाणपत्रांसाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर परिपूर्ण भरल्यावर आवश्यक दस्ताऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमीट करावे. त्यानंतर त्याची प्रिंट घेवून पुढीलप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखील स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्विकारले जाणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.