Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; तीन आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने नाकारला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आणिबाणीसदृष्य काळात रेमेडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांचा जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे.

खंडपीठाने याबाबत कठोर भूमिका घेत कनिष्ठ न्यायालयाला वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने न्या. झेंड. ए. हक यांनी दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दरम्यानच्या काळात न्यू कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यावर न्या. रोहित देव यांच्या समक्ष सुनावणी झाली. प्रकरण गंभीर असल्याने आणि आरोपी हतबल नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने न्यायालयाने जामीन नाकारला.

त्यानुसार, आरोपींनी अर्ज मागे घेतला. सरकारपक्षातर्फे अॅड. मेहरोज पठाण यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजात पोलिस विभागातर्फे उपनिरीक्षक अविनाश अक्केवार यांनी सहकार्य केले. जामिनासाठी कुणाल पोवळे यांच्यासह इतर तीन जणांनी अर्ज केला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबन कालावधीत वाढ

ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.