Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चितळाचे मास घरात ,वन कर्मचाऱ्यांची गाडी दारात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गिलगाव परिसरात चितळाची शिकार करून मांसाची वाटणी झाली व ते शिजवले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी १: १५ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी गिलगाव येथील संशयित आरोपी पंकज शंकर पिंपळवार यांच्या घराची पाहणी केली असता त्याच्या घरून, वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मांस आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी करून मांस, ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा केला.

गडचिरोली दि ३१ मार्च : चामोर्शी तालुक्यातील  कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात चितळाची शिकार करून मांस घरी नेवून शिजवित असल्याची गोपनीय माहिती वनअधिकारी यांना मिळताच वनअधिकार्यांनी मोठ्या शिताफीने “त्या” आरोपींना त्यांच्या घरी शिजविलेल्या मांसासह घरून ताब्यात घेत शनिवार ३० मार्च रोजी गिलगाव (जमीनदारी) येथे  चार आरोपीना अटक करण्वियात यश आले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मध्ये आरोपी पंकज पिंपळवार याला कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून चौकशी करून त्याचा कबुली जबाब नोंदविला. यावेळी त्याने अरुण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दोघेही रा. गिलगाव (जमीनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना आदींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. इतर सर्व कार्यवाही पूर्ण करून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यातील पंकज, अरूण व रोहिदास यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी तर विलास बोदलकर यास एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली वन विभागाचे सहायक वनसंरक्षक धीरज ढेंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. एम. तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे, वनरक्षक के. एम. मडावी हे करीत आहेत. या कारवाईसाठी अन्य वन कर्मचारी व वनाधिकान्यांचे सहकार्य लाभले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

गॅस सिलेंडर दरात मोठी घट ! काय आहेत नवे दर?

नक्षल्यानी केली एका इसमाची हत्या..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.