Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गॅस सिलेंडर दरात मोठी घट ! काय आहेत नवे दर?

निवडणुकीच्या धर्तीवर केंद्राचा मोठा निर्णय. काय आहेत नवे दर? पाहा सविस्तर वृत्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

1 एप्रिल 2024 या नव्या महिन्यापासून गॅस सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहे. अर्थात ही घट घरगुती गॅस सिलेंडरवर लागू नसून ती व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठीच लागू करण्यात आली आहे हि विशेष महत्त्वाची बाब आहे .मार्च महिन्यामध्ये हे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात गॅसचे दर 14 रुपयांनी वधारले होते. जानेवारी महिन्यात ही वाढ अवघ्या 1.50 रुपये इतकी होती. दरम्यान, व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं वाढ आणि त्यानंतर घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत.  . 

नवी दिल्ली दि,१ एप्रिल : लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर असतानाच केंद्राकडून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे .निवडणुका लक्षात घेता केंद्र  सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्या या निर्णयांपैकीच एक म्हणजे गॅस सिलेंडरचे दर  काही दिवसांपूर्वीच शासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा  निर्णय घेतला.

त्यातच आता निवडणुक काही दिवसांवर असतानाच शासनानं गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्याचा निर्णय घेतला असून  सातत्यानं तीन महिण्यापासून दर वाढ कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न  दिसून येत आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

1 एप्रिल 2024 या नव्या महिन्यापासून गॅस सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहे. अर्थात ही घट घरगुती गॅस सिलेंडरवर लागू नसून ती व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठीच लागू करण्यात आली आहे ही महत्त्वाची बाब आहे .

एकंदर आकडेवारी पाहिली असता मार्च महिन्यामध्ये हे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात गॅसचे दर 14 रुपयांनी वधारले होते. जानेवारी महिन्यात ही वाढ अवघ्या 1.50 रुपये इतकी होती. दरम्यान, व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं वाढ आणि त्यानंतर आता एप्रिल महिन्यात मोठी घट झालेली असतानाच घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत.

हे देखील वाचा ,

Comments are closed.