Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

"राजुरा तालुक्यातील धिडशी येथील घटना"

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि,13 नोव्हेंबर :  राजुरा तालुक्यात येत असलेल्या मारडा (लहान) येथील महेश अनिल पिंपळकर (२१ ) हा दुर्गापूर आपले वैयक्तिक काम आटपून घरी येत असताना सायंकाळी ७:०० वाजता च्या दरम्यान धिडशी गावालगत शेतातून येत असलेल्या बैलबंडीला जोरदार धडक दिल्याने महेश चा  जागीच मृत्यू झाला.

प्राप्त झालेल्या  माहितीनुसार महेश पिंपळकर यांची शेती WCL मध्ये गेलेली आहे, आणि त्यांचे नुकतेच WCL दुर्गापूर येथे नोकरीपूर्व एक महिन्याचे प्रशिक्षण (VTC) सुरू होते. दुर्गापूर येथून आपले प्रशिक्षण करून घरी येत असताना धिडशी गावाबाहेर संतोष सपाट यांच्या गोठ्याजवळ शेतातून कापसाचे गाठोडे वाहून आणणाऱ्या कौरासे यांच्या बैलबंडीला जोरदार धडक दिली यात महेश पिंपळकर हा जागीच ठार झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महेश हा आई-वडिलांना एकुलता एक असून नुकतीच त्यांची शेती WCL ला जाऊन त्यांना नोकरी लागली होती. नेहमीप्रमाणे दररोज प्रशिक्षणाला जात होता, आपले प्रशिक्षण आटोपून लवकर घरी जाण्याच्या नादात वेगात मोटरसाईकल असल्याने धडक एवढी जोरदार होती की मोटरसाईकल बैलबंडीच्या आत घुसली यात बैल सुद्धा जखमी झालेला आहेत.

सदर घटनेची माहिती राजुरा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून गावातही या  घटनेची माहिती होताच  एकच शोककळा पसरली असून  घरातील  एकुलता एक मुलगा गमावल्याने उमेदीच्या काळात हातभार मिळणार त्याच काळात काळाने हिरावून घेतल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा

 

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.