Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा?

ग्यारापत्ती–कोटगुल मरदिनटोला जंगल परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या चकमकीत सहा च्या वर नक्षल ठार झाल्याची शक्यता. पोलीस नक्षल चकमकीत खात्मा झालेल्या मध्ये नक्षल दलमचा मोठा नेता असल्याचा प्राथमिक अंदाज.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर :
ग्यारापत्ती–कोटगुल मरदिनटोला जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास झालेल्या  चकमकीत ६ पेक्षा जास्त नक्षल्यांना खात्मा केल्याचे वृत्त प्राप्त झाले असल्याने सी-६० पोलीस जवानांना मोठे यश प्राप्त झाले असून चकमक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

गडचिरोली पोलीस विभागाला सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहिती वरून ग्यारापत्ती–कोटगुल मरदिनटोला जंगल परिसरात नक्षल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे सी-६० पोलीस जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला असता पोलीस जवानांनी संरक्षणार्थ  नक्षल्या विरोधी बंदुकीने फैरी झाडून जशाच तसे प्रतीउत्तर दिले असून चकमक सुरु असल्याची माहिती आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस व नक्षल चकमक सकाळपासून सुरु झाली असून आता हि अंधाधुंद गोळीबार सुरु असून सहा नक्षल ठार झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षल घटनास्थळावरून जंगलाचा आसरा घेत  चकमक सुरुच ठेवली असली तरी  पोलीस जवानांनी जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम अधिक तीव्र केली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे साहित्य हस्तगत करण्यात पोलीस जवानांना मोठे यश आल्याचे बोलले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस नक्षल चकमकी संदर्भात पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केला असता घटनेला दुजोरा दिला असला तरी मृत नक्षल संदर्भात बोलण्यास टाळले आहे. मात्र या घटनेत नक्षल दलममधील मोठा नेता मारल्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.अधिकृत  अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मिळणार असले तरी नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

गडचिरोली अधिकाऱ्यांच्या नक्षल विरोधी रणनीती तसेच पोलीस जवानाच्या धाडसी कारवाईने कित्येक नक्षलला जीवास मुकावे लागले आहे  तर दुसरीकडे नक्षल चळवळीत असलेल्या नक्षलला आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आल्याशिवाय पर्याय उरला नसल्याने हतबल झालेल्या नक्षलयांना हद्दपार होण्याची संकेत मिळत असून गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

 

Comments are closed.