Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती शहरात आज बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयतर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.

प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की, अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद आहे.

 

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी: पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा?

मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

 

Comments are closed.