Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

मानधन तत्त्वावरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यथा. वयोमर्यादेची अट टाळून अनुभवचा लाभ घेण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

Exclusive News – ओमप्रकाश चुनारकर
महाराष्ट्र हे पहिले राज्य असावे ज्यांनी सन २०१९ मध्ये  वन्यजीव संवर्धनासाठी स्वतंत्र पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) हि पदे निर्माण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संवेदनशील असणारे महाराष्ट्र शासन यांनी प्रदिर्ग अनुभव व वन्यजीव व्यवस्थापक कौशल्य असणारे वन सेवेतील अनुभवी पशु वैद्यकीय अधिकारी यांना विशेष बाब म्हणून कायम केल्यास वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचा उद्देश निश्चितच सफल होईल. यात शंका नाही.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

नागपूर डेस्क, दि. १२ नोव्हेंबर : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी  अपेक्षित शिक्षणाची अटी व शर्तीनुसार पद निर्मिती करून वनविभागात पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची जाहिरात काढून, मुलाखतीद्वारे मानधन त्ववावर निवड करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पशु चिकित्सक होण्यासाठी किमान शिक्षणात ८ वर्षाचा कालावधी पूर्णपणे जात असतो. अशाच पात्र असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आली असून साधारण ८ ते १० वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या काम केले आहे. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वनासह विविध राष्ट्रीय वन्यप्राणी उपलब्ध आहेत. त्यांचे निगा राखण्यासाठी किंवा मानव वन्यजीव संघर्ष निर्माण झाल्यास महत्वाची भूमिका   तरबेज असलेल्या तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवश्यावर निर्णय घेतले जातात.

अनेकदा हिस्त्र पशूवर नियंत्रण यशस्वीपणे हाताळण्यासाठी अनुभव व उत्तम सेवा दिलेले पशु वैद्यकीय अधिकारी सदैव कार्यरत राहून उमेदीचा काळ गेल्यावर आता वनप्रशासक म्हणतात की, आपण वयोमर्यादा पार केलीय! म्हणून नवीन वन्यजीव अनुभव नसलेल्या लोकांना संधी देण्यासाठी मोठे पाऊले उचलली जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रदीर्घ अनुभव असलेल्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भविष्य अंधारात ठेऊन वनप्रशासन वन्यजीवांची हानी होण्यापासून वाचवू शकतील काय. हाच प्रश्न निर्माण होतो आहे. 

वनविभागाच्या निवडप्रक्रियेतून पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून अख्खे आयुष्य फक्त वन्यजीवासाठी वाहून घेतले, अनेकदा कठीण समयी वन्य प्राण्यावर प्रेम जडल्याने प्राण्यांसाठी वाटेल ते करण्यासाठी अनुभवाच्या भरोशावर तत्पर असायचे. कधीकधी हिस्त्र प्राणी आक्रमक झाल्याने त्यांच्या जबड्यातूनही बाहेर येऊन न डगमगता त्याच प्राण्यावर सुरक्षित होत पर्यंत जीवाचे रान करणारे वैद्यकीय अधिकाऱ्यावर आज टांगती तलवार वनप्रशासन निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. जंगलातील वन्य प्राण्यावर मोठ्या चीकित्साने जीवाचे रान करून निर्मळ सेवा बजावली आहे. ती फक्त प्रदीर्घ अनुभवाने.

पशु वैद्यकीय अधिकारी यांची वनातील घटना वन्य प्राण्यासंबंधित असल्यास चंद्रपूर, गडचिरोली वन अधिकाऱ्यांसोबत पूर्ण काळ सेवा देऊन कित्येक वनातील विविध वन्यप्राण्यांना जीवनदान देऊन, त्याची वाह-वाह करीत वन प्रशासनाने दखलही घेत विविध पुरस्कार, प्रमाणपत्र वरिष्ठ वन प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून तसेच तत्कालीन वन व वित्त मंत्री मा. सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांच्याकडून उत्कृष्ट पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र आता कायम करण्याची प्रक्रिया सुरू असताना वन प्रशासन म्हणतात आपण वयोमर्यादा पार केली आहात.

सध्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट वन व वन्यजीव विदर्भात उपलब्ध आहेत. अनेक वन्यप्राणी, हिस्त्र पशु विदर्भातच पाहायला मिळतात. सध्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. अशा विपरीत परिस्थितीत वनविभागात मानव वन्यजीव संघर्ष यशवीरित्या हाताळण्याचा  प्रदीर्घ व दांडगा अनुभव असलेले वन्यजीव चिकित्सकाची वनविभागात यांच्या सेवेची नितांत आवश्यकता असतांना अशा परिस्थितीत अनुभवी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष बाब म्हणून कायम केल्यास वन्यजीव संवर्धन व मानव वन्यजीव संघर्ष हाताळणे सोपे होईल.

वन्यजीवांची सेवा करतांना वन्यजीवाबद्दल  तसेच मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्याचा दांडगा अनुभव असणे अतिआवश्यक आहे. त्यामुळे वयोमर्यादा पार केली ह्या सबबीखाली त्यांना डावलने म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, कौशल्य किंबहुना मानवीय दृष्ट्या अन्याय होय, सध्या स्थितीचे अवलोकन पाहता हे प्रशासनाच्या व वन्यजीवाच्या हिताच्या दृष्टीने चुकीचे होईल. तेव्हा त्यांचा अनुभव, प्रदीर्घ सेवा लक्षात घेता, विशेष बाब म्हणून सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन (वन्यजीव) या पदावर कायम करण्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वन्यजीव प्रेमी व वन्यजीव संस्था यांची मागणी सर्वच स्तरावरून जोर धरू लागली आहे.

वन प्रशासकानी वन्यजीव हित व प्रशासकीय हित ओळखून, वन्यजीव अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करून वन्यजीवास न्याय द्यावा. महाराष्ट्र वन विभागाने वन्यजीव संबधी अतिशय संवेदनशील राहून २०१९ मध्ये वन विभागात स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकारीचे पदे निर्माण केलेत, हे किंबहुना देशात प्रथम घटना आहे, मात्र पद भरती प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे विशेष म्हणजे आता वन प्रशासन अनुभवी, ज्यांनी आपले अख्खे आयुष्य वन्यजीव सेवेत खर्ची घातले त्यांना वयोमर्यादा चे कारण देऊन डावलन्याचा प्रकार फारच अमानवीय आहे.

 


हे देखील वाचा :

चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

 

Comments are closed.