Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पुणे डेस्क, दि. २ जुलै :  पाच मित्रांकडून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी मागील दोन वर्षापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.  आरोपींनी कधी अलिशान वाहनात तर कधी लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

याप्रकरणी पीडितीने गुरुवारी (१ जुलै) रात्री उशिरा आळेफाटा पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेत. तिचे फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार केल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे.

तरुणीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पाच मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रकरणी पीडितीचे तक्रारीवरून निखिल पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे, यश गाडेकर सर्वांचे वय २८ वर्षापेक्षा अधिक राहणार आळेफाटा परिसर यांच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपीसह एक आलिशान वाहन ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार या घटनेचा पुढील तपास करत आहे.

हे देखील वाचा :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

प्रा. प्रकाश घोडमारे यांचे अहेरी उपविभागातील क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान, त्यांनी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होवु नये – एम. एल. मद्देर्लावार

गडचिरोली जिल्ह्यात आज 29 कोरोनामुक्त तर 14 नवीन कोरोना बाधित

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.