Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

सरकार वेळकाढूपणा करून आमच्या आत्महत्येची वाट पाहतय- एस टी कर्मचारी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

उस्मानाबाद, दि. २६ फेब्रुवारी :  उस्मानाबाद येथे एसटी विलिनीकरणाबाबत निर्णय होत नसल्याने आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह बस स्थानकात आणण्यात आलाय. हनुमंत अकोसकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.

त्यांनी काल रात्री उस्मानाबादेत आपल्या राहत्या घरी उशीरा विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. हा मृतदेह बस आंदोलन स्थळी आणल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण तयार झाले आहे. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे ही आत्महत्या झाल्याचा आरोप एस टी कर्मचाऱ्यांनी केला असून सरकार वेळकाढूपणा करून आमच्या आत्महत्येची वाट पाहतय असा घणाघात त्यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी, शासन निर्णय जारी

राज्यसरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.