Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन् वेळेतच पोहोचल्याने अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वाशीम, दि. २६ फेब्रुवारी : शासन मुलीचे विवाहाचे वय २१ वर्ष करण्याच्या विचारात असतांना सद्या असलेला १८ वर्षे वयाचा निकषही पायदळी तुडवत वाशिम जिल्ह्यात मोठ्या थाटात बालविवाह संपन्न होत आहेत हे भयाण वास्तव आहे.

अल्पवयीन मुलीच्या लग्नाच्या प्रयत्नामुळे बालविवाह समस्येचे गांभीर्य वाशीम जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर बालविवाह होऊ नये, यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंड होऊ शकतो. परंतु, या कायद्यांना न जुमानता लपूनछपून बा‌लविवाह करण्याचे प्रमाण व बालविवाह तत्परतेने थाबवण्याचे प्रमाण वाशीम जिल्ह्यामध्ये वाढतच आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाशिम येथुन अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या काटा या गावी एक १४ वर्षीय कोवळ्या बालिकेचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाइल्डलाइनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली होती. त्यावरून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवण्याचे आदेश दिले. त्यावरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी या गावातील लग्न घरी जाऊन समुपदेशन करून कायद्याविषयी माहिती देऊन हा बालविवाह रोखण्यात आला, लग्न १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करणार असे हमीपत्र कुटुंबियांकडून लिहून घेण्यात आले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग…

राज्यसरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

Comments are closed.