Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर :  शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी १० वर्षे कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मनोज जर्नादन भिसे  (४५) असे नराधमाचे नाव आहे.

भिसे याने शेजारी राहणाऱ्या एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. पोलिसांनुसार, ही घटना १९ ऑक्टोबर २०१७ ते १० एप्रिल २०१८ या काळात नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलगी आरोपीच्या शेजारी असल्याने त्यांची ओळख होती. घटनेच्या दिवशी त्याने मुलीला खर्रा आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी पीडित मुलीला तो घरी घेऊन आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतरही तिच्यावर अत्याचार करत राहिला. पीडित मुलीच्या पालकांना ही बाब कळल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करीत तपासाअंती त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात अॅड. आसावरी परसोडकर यांनी सरकारची तर अॅड. बदर यांनी आरोपीची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित त्याला शिक्षा सुनावली.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.