Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला. यात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत.

येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात एक बुरखाधारी युवक आला. त्या युवकाने परिसरातील एका युवकावर गोळीबार करून पळ काढला. या घटनेला सुरज बहुरिया हत्याकांडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. गोळीबार करणाऱ्या आणि जखमी युवकांची नावे कळू शकली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली असुन पोलिसांची कारवाई सुरु आहे.

हे देखील वाचा:

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत लाखोचा भ्रष्टाचार – राजु झोडे

देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु

Comments are closed.