Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वंदे भारत एक्स्प्रेसची गायीला धडक, दोन दिवसात दुसरा अपघात..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई , ७ ऑक्टोबर २२ : मुंबई – गांधीनगर- वंदे एक्स्प्रेसला दोन दिवसात दुसरा अपघात झाला आहे. गुजरात मधील आणंद स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसने एका गायीला धडक दिली. शुक्रवारी दुपारी ३.४८ वाजता हा अपघात झाला. विशेष म्हणजे कालच गुरूवारी एक्स्प्रेसने अहमदाबाद जवळ चार म्हैशिंना धडक दिली होती. यात एक्स्प्रेसचा दर्शनी भागाचे (ट्रेनच्या नोज पॅनल) नुकसान आले. माञ सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत ट्रेनच्या धडकेत गुरुवारी (६ ऑक्टोबर) रोजी सकाळी 11:15 च्या सुमारास अहमदाबादजवळ ४ म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी देखील अशीच घटना घडली आहे. गुजरातच्या आणद रेल्वे स्थानकाजवळ भरधाव एक्सप्रेस ट्रेन च्या धडकेत गायीचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे गुरुवारी झालेल्या अपघातात या एक्सप्रेसचा जो भाग नुकसानग्रस्त भाग दुरुस्त केला होता त्याच भागाला पुन्हा जोरदार फटका बसल्याने पुन्हा एक्सप्रेसचे लॉज पॅनल तुटले आहे. मात्र दोन्हीही अपघातांमध्ये प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. तसेच गुरुवारी झालेल्या अपघातात चार मशीन चा मृत्यू म्हशींचा मृत्यू झाला होता त्याप्रकरणी जीआरपी ने अज्ञात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिरा-भाईंदर मधील पहिल्या वॉकिंग प्लाझाचे उदघाटन

सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरेंना महागाई, हिंदुत्वाची आठवण झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.