Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी केली हळहळ व्यक्त

मृतांच्या नातेवाइकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक 8 ऑक्टोबर :- नाशिक येथे घडलेल्या बसच्या दुर्देवी घटनेत १० प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

त्याचसोबत पंतप्रधान निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार जाहीर करण्यात आले आहेत. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने जवळपास १० प्रवासी होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली  आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

दैव बलवत्तर म्हणून बचावलो पहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेलो असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.