Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर मोदी, शहा आणि फडणवीस सुद्धा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 8 ऑक्टोबर :- दहशतवादी संघटनेकडून देश-राज्य पातळीवरील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.पीएफआय वर बंदी घातल्यावर या धमक्यांचे सत्र जोरात सुरू झालें आहे. केंद्र सरकारने ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर नुकतीच बंदी घातली. याच गोष्टीचा राग मनात धरून एका अनोळखी व्यक्तीने भाजप (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Solapur) यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठविले आहे. टपालातून त्यांना ४ ऑक्टोबरला घरपोच पत्र मिळाले असून त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची तातडीने भेट घेतली. त्यानंतर पत्रातील ‘त्या’ व्यक्तीचा शोध गुन्हे शाखा व ‘एटीसी’ने सुरु केला आहे

दहशतवाद्यांशी संबंध ठेवून देशविघातक कृत्य करण्याच्या तयारी असल्याच्या कारणातून ‘पीएफआय’ संघटनेवर घातली गेली. त्या निर्णयाला काही दिवस होताच सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार देशमुख यांना एकाने धमकीचे पत्र पाठविले आहे. आमच्या संघटनेवर बंदी घातली, काही फरक पडणार नाही, असेही त्यात म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 पत्रातील मजकूर
‘विजयकुमार अब सुरू हो गया असली जंग, तुम्हारा नरेंद्र मोदी व अमित शहा इन्होने जो गलत काम किया है’. उसे उसका परिणाम भुगतना पडेगा’ असा मजकूर त्या पत्रात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही त्या पत्रात उल्लेख आहे. आयोध्या, मथुरा, काशी ही ठिकाणे आमचे ‘सुसाईड बॉम्बर’ एका दिवसात उडवतील, अशीही त्यात धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान,‘पीएफआय’शी संबंधित आसिफ अस्लम शेख याला काही दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, विजापूर नाका पोलिसांनी पुन्हा बाजू मांडत त्याची कोठडी ११ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. त्याचा मोबाइल आणि त्याच्याकडे मिळालेल्या ‘सीडी’चा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.