Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि, 15 जुलै :- रानडुकराची शिकार करून त्याचे मास विकण्याच्या तयारीत असलेल्या ३ आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी आणखी आरोपी असल्याची शक्यता असून, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मीलीश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास केला जात आहे.

चातगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अमिर्झा येथील कक्ष क्र. 415 मध्ये धोंडेशिवनी या गावातील शिकार्‍यांनी रानडुकराची शिकार करून, डुकराचे मास विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मीलीश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांना प्राप्त झाली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून उपवन संरक्षक यांच्या मार्गदर्शनात तात्काळ सापळा रचून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवळे यांच्या नेतृत्वात अमिर्झा कक्षामध्ये वनाधिकाऱ्यांनी भिकारमावशी ते बोथखेडा रोडवर सापळा रचला होता. नेमके त्याच ठिकाणी आरोपी रानडुकराची शिकार करून आणत असताना तीन आरोपींना रंगेहात रानडुकराच्या मासासह ताब्यात घेण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या शिकार प्रकरणात धोंडेशिवनी येथील तीन आरोपी ताब्यात घेतले असून, आरोपी हेमंत मडावी, डब्बाजी जराते ,श्याम जराते अशी त्यांची नावं आहेत. मांस खाण्यासाठी व विक्रीतून मिळणाऱ्या नफा मिळवण्यासाठी रानडुकराची शिकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. सदर प्रकरणात अधिक आरोपी असल्याचे चौकशीत समोर आले असून या घटनेची माहिती मिळताच सोबत असलेले अन्य आरोपी फरार झाले झाले आहेत. वन कर्मचारी फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास उपवनसंरक्षक गडचिरोली सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .

सदर कारवाईत क्षेत्र सहाय्यक राकेश तांबे ,संदीप आंबेडारे ,सिद्धार्थ मेश्राम, रुपेश मेश्राम ,वनरक्षक राजू दुर्गे , रुपेश आनंदपवार, गजानन सिडाम, राजू शेट्टी अंकुश मडावी वनमजूर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  : 

सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजाकरीता अनुदान योजना

धनगर समाजातील नवउद्योजक महिलांकरीता शासनाची स्टँड अप इंडिया योजना

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.