Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),गडचिरोली येथे जिल्हा समन्वयक अधिकारी म्हणून आहेत कार्यरत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 15 जुलै :  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),गडचिरोली येथे जिल्हा समन्वय अधिकारी कार्यरत असलेले  सचिन देवतळे यांनी आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क भंडारा या ठिकाणी डॉ. नरेश एस. कोलते यांच्या मार्गदर्शनात “तेजस्विनी कार्यक्रमा अंतर्गत असलेल्या स्वयंसहायता महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक व सामजिक सक्षमीकरणा विषय चिकित्सात्मक अध्ययन (विशेष संदर्भ – नागपूर जिल्ह्यातील लोक संचालित साधन केंद्रातील महिला)” या विषयावर शोध प्रबंध निर्माण करून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आचार्य पदवी (पी. एच डी.) करीता सादर केला असता त्या शोधप्रबंधकाची निवड झाल्याचे नुकतेच प्रसिद्धी करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव समाविष्ट आहे.

जिल्हा समन्वय अधिकारी सचिन वी. देवतळे यांना आचार्य पदवी (पी.एच डी.) करीता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई मुख्यालयातील अधिकारी, विभागीय अधिकारी, नागपूर जिल्ह्यातील अधिकारी व लोक संचालित साधन केंद्रातील कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच गुरुवर्य असलेले थोटे समाजकार्य महाविद्यालय नागपूर चे प्राचार्य डॉ.प्रा.थोट सर, आठवले कॉलेज चे संस्थापक डॉ.चंदनसिंग रोटोले, नालंदा फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष व आठवले कॉलेज भंडारा येथील प्रा.अमोलसिंग रोटोले, डॉ.चंद्रमणी गजभिये,यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सचिन देवतळे यांनी केलेल्या संशोधनाचा स्वयं सहायता महिला बचत गट चळवळीला व महिला सक्षमीकरण करण्याकरिता मोठा उपयोग होणार आहे. सचिन देवतळे यांना आचार्य पदवी (पी.एच डी.) बहाल झाल्याबद्दल आई श्रीमती मंदाकिनी वी. देवतळे, पत्नी मोनिका सचिन देवतळे, भाऊ सुहास, स्वप्नील, मुलगी तृशा, मुलगा शौर्य, जिल्हा अग्रणी बँक गडचिरोली चे प्रबंधक युवराज टेभूर्णे सर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गडचिरोली चे शुभम कोमरेवार, जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली चे महाव्यवस्थापक पवार, हेल्दी माईंड फाऊंडेशन मुंबई चे संचालक दिलीप जाधव, कौन्सिल ऑफ युनिव्हर्सल बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी नागपूर चे संचालक विलास देशभ्रतार, जेंडर इक्वलिटी ऑर्गनायझेशन नागपूर चे संचालक चंचल पटले, विक्रांत अभोर, आनंद बागडे सर व मित्र किरण मनोहर, डॉ. श्वेताल कांबळे ,कैलास बारसागडे,विनोद राऊत,चंद्रशेखर लांडे,गणेश नाईक आदिने शुभेच्छा व अभिंदन केले आहे.

Comments are closed.