Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

17 जुलै 22 रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलावी… विद्यार्थी व पालकांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर पेन आणि पेपर स्वरूपात होणार आहे. दरम्यान नीट यूजीचे (NEET UG 2022) परीक्षार्थी गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. नीट आणि जेईई (JEE Exam) या दोन्ही मुख्य परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात आणि यावेळी जेईई आणि नीट परीक्षेमध्ये दिवसांचे अंतर कमी आहे. तसेच सीयूईटी परीक्षाही (CUET Exam) जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याने विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक परीक्षांची तयारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियातून कॅम्पेन उभे केले आहे.

चंद्रपूर, 15 जुलै :  महाराष्ट्र राज्यात ढगफुटी व अति मुसळधार पावसामुळे जिकडे पाहावे तिकडे नदी, नाल्यांना पूर असल्यामुळे वाहतूक व्यवस्था पार ठप्प झाली आहे. त्यामुळे दिनांक 17 जुलै 22 रोजी होणाऱ्या नीट युजी परीक्षेसंबंधी शासन कोणता निर्णय घेतो याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक 20 जुलै रोजी होणारी स्कॉलरशिप परीक्षा ज्या प्रकारे शासनाने पुढे ढकलून 31 जुलै 22 ला घेत आहेत त्या पद्धतीने शासनाने नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यां संबंधी योग्य निर्णय घ्यावा. शासनाने वेळीच 17 जुलै रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसंबंधी पावले उचलून विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर करावा.

राज्यातील बिघडलेल्या पूर परिस्थितीमुळे परीक्षेच्या ठिकाणी खेडेगावापासून ते शहरी भागातील जाणारे मार्ग बंद असल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पालकांना वाटते की माझा पाल्य परीक्षेच्या ठिकाणी पोहचला नाही तर परीक्षेला मुकेल आणि त्याचे वर्ष वाया जाईल. आपल्या पाल्यावर त्याने केलेला खर्च सुद्धा पाण्यात बुडेल..? नीट परीक्षेला बसणारे बरेचसे विद्यार्थी हे शहरा पाठोपाठ खेडेगावातील सुद्धा आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा नीट परीक्षेचे केंद्र असून हे सध्या पुराने वेढलेले आहेत. त्यांना जुळणारे रस्ते हे पुराच्या पाण्याखाली आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प आहे. सदर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहोचणे मोठे अवघड झालेले आहे. आणि पोहोचायचे झाल्यास एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हवाई मार्ग हेलिकॉप्टर च्या साह्याने संपूर्ण पूर परिस्थितीचा, हवामान खात्याच्या दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार शासनाने 17 जुलै 22 रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांत जोर धरत आहे.

हे देखील वाचा : 

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजाकरीता अनुदान योजना

 

 

Comments are closed.