Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात 144 कलम लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.15 जुलै : राष्ट्रीय परीक्षा एजेंसी मार्फत घेण्यात येणारी National Eligibility Cum Entrance Test (UG)-2022 (NEET Exam-2022) दिनांक 17 जुलै 2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याने परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे.

जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी,टायपिंग सेंटर, एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमानां परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन,सेल्यूलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करु नये. तसेच परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनीप्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये. कोवीड-19 चे अनुषंगाने,शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही आदेश निर्गमीत केले आहे.

हे आदेश परिक्षा केद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी,परीक्षार्थी,निगराणी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही.तसेच हे आदेश दिनांक 17 जुलै 2022 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षेच्या दिवशी गडचिरेाली येथील सर्व संबंधित परीक्षा केंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

 

Comments are closed.