Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईतल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ ..

भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई प्रतिनिधी 15 जुलै :- भारतातील जागतिक दर्जाची जीव औषध निर्माण, संशोधन आणि चाचणीसाठी प्रसिद्ध असलेल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ (मर्या) (Haffkine Biopharmaceutical Corporation Limited)मध्ये एका महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काम करणाऱ्या एका 40 वर्षीय पीडित निवृत्त महिला अधिकाऱ्याने केलेल्या लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या आरोपानंतर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे आपल्या जीवाला धोका असून या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी पिडीत महिलेने केली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणी हाफकिन महमंडळाच्या एकूण सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, यात दोन महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.  मुंबईतल्या परेल येथील हाफकीन महामंडळ येथे पिडीत महील कामाला होती. तेथील काही वरिष्ठ अधिकारी तसेच युनियन लीडर यांनी तिच्यावर लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचार करत होते. म्हणून पिडीत महिलेने त्यांच्या विरुद्ध हाफकिन महामंडळातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशा प्रमाणे स्थापन झालेली महिला लैंगिक अत्याचार विरोधी समिती (विशाखा कमिटी) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यास गेली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे सदर समितीने तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुुळे न्याय मिळावा म्हणून पिडीतेने भोईवाडा पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवरोधात रीतसर तक्रार नोंदविली आहे . पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारीची नोंद घेऊन हाफकाईन मधील एकूण सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यात दोन महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोपींची नावे
1.श्री.अमित डोंगरे – कामगार कल्याण अधिकारी

2.श्री.दीपक पेडणेकर- हाफकाईन मान्यताप्राप्त युनियनचे उत्पादन सहाय्यक आणि सचिव

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

3. श्री.बबन ढेकणे– उपव्यवस्थापक उत्पादन आणि हाफकाईन अधिकारी संघटनेचे सचिव
4. श्री. सुभाष शंकरवार– जनरल व्यवस्थापक उत्पादन
5. सौ. सोनल सावंत- उपव्यवस्थापक उत्पादन आणि हाफकाईन ऑफिसर असोसिएशनचे अध्यक्ष
6. श्रीमती शमिका पड्याल- आस्थापना अधिकारी

या सर्व आरोपींच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात भादंविच्या 354, 354(अ), 354(डी), 341, 509, 506, 507, 34 भा.दं.वि., एफआयआर क्र. 741/2022 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नाही, पीडिता ही 40 वर्षीय असून त्या या संस्थेत मॅनेजर म्हणून काम करत होत्या. सध्या त्या निवृत्त झाल्या आहेत.

“सर्व आरोपींवरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी, माझ्यावर लैंगिक व शारीरिक अत्याचार करणारे मुख्य आरोपी श्री.अमित डोंगरे, श्री. दीपक पेडणेकर, श्री.बबन ढेकणे, श्री. सुभाष शंकरवार यांना अद्यापही अटक किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे व मला या प्रकरणात न्याय मिळावा” अशी विनंती पिडीत महिलेने केली आहे. तर, “या प्रकरणी आपण कायदेशीर लढाई लढून पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करणार” असल्याचे पीडित महिलेचे वकील ऍड नितीन सातपुते यांनी लोकस्पर्श न्युज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

Haffkine बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे हाफकाइन इन्स्टिट्यूटचा एक भाग होता, ही देशातील सर्वात जुनी बायोमेडिकल संशोधन संस्था आहे. 1899 मध्ये हाफकिनची स्थापना करण्यात आली आणि प्लेग लसीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञ (डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन) यांच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले. तेव्हापासून, हाफकिन इन्स्टिट्यूट ही एक बहु-अनुशासनात्मक संस्था म्हणून उदयास आली आहे जी संसर्गजन्य रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीमध्ये गुंतलेली आहे. बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन हे महामंडळ 1974 मध्ये वेगळे झाले. आता ते निमशासकीय महामंडळ आहे. अशा सस्थेमध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा :-

गडचिरोलीत महा भयावह विदारक पूरस्थिती ….

चंद्रपुरात 6 जणांना पुरात फसलेल्यांना एनडीआरएफ च्या जवानांनी सुरक्षित काढले….

Comments are closed.