Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रत्नागिरीतल्या ३ चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात तर एकाचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रत्नागिरी – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३  हजार मुले कोरोना बाधित झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुलांची प्रतिकार क्षमता चांगली असल्याने त्यांनी या महामारीवर यशस्वी मात केली. मात्र एका १० वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला. तर समाधानाची बाब म्हणजे ३ चिमुकल्यांनी डेल्टा व्हेरिएंटवर या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर मात केली आहे. मुलांना सकस आहार देऊन विशेष काळजी घेतल्याने हे शक्य झाले आहे, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी व्यक्त केला. पालकांनी यापुढे मुलांबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील बालके कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात २ हजार ९०८ मुलांना कोरोना बाधीत झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये ० ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समाधानकारक बाब म्हणजे मुलांमध्ये चांगली प्रतिकारक्षमता असल्याने सर्व मुलांनी कोरोनावर मात केली आहे. जून महिन्यात ७० ते ८० मुले कोरोना बाधित होती. या मुलांमध्ये सर्दी, ताप, अशी लक्षणे आढळून आली. मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही. पालकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.

संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा व्हेरिएंटचे ९ रुग्ण आढळून आले होते. उपचारानंतर हे ९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या तीन बालकांचा यामध्ये समावेश होता. ३ वर्षे, ४ वर्षे आणि ६ वर्षांच्या बालकांना डेल्टा व्हेरिएंट कन्सर्न होता. मात्र त्यांनी त्यावरही मात केली आहे. लहान मुलांमध्ये डेल्टा व्हेरिएन्ट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे. मात्र पालकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.